Extra Marital Affair | संशय आला अन् तिने नवऱ्याला गर्लफ्रेंडबरोबर पकडले रंगेहाथ; संतापलेल्या बायकोनं असं काही म्हटलं की… व्हिडीओ होतोय व्हायरल

Extra Marital Affair: नवरा-बायकोच्या नात्यामध्ये प्रामाणिकपणा हवा; अन्यथा त्या नात्याला अर्थ उरत नाही. पण हे माहीत असतानाही काही लोक सर्रास विवाहबाह्य संबंध ठेवतात. अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला आहे. ही व्यक्ती गुपचूप आपल्या प्रेयसीबरोबर हॉटेलच्या खोलीत आनंद साजरा करीत होती. पण तेवढ्यात बायको तिथे आली अन् तिने त्याला रंगेहाथ पकडले. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ…

 

 

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका पत्नीने तिच्या पतीला हॉटेलमध्ये त्याच्या प्रेयसीबरोबर रंगेहाथ पकडले. पत्नीला तिच्या पतीच्या हालचालींवर आधीच संशय होता म्हणूनच तिने तिच्या मुलांसह आणि काही नातेवाइकांसह पतीला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. जेव्हा ते हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की, पती एका खोलीत प्रेयसीबरोबर मजा करीत आहे. तिथे वाईन आणि केकचीही सोय होती. पार्टीसाठी ते पूर्णपणे तयार होते. त्याच वेळी पत्नीने दार ठोठावले. जेव्हा पतीने दार उघडले तेव्हा तो त्याच्या समोर पत्नीला पाहून चकित झाला आणि भीतीने त्याचा चेहरा फिका पडला होता.

 

रंगेहाथ पकडूनही पतीची निर्लज्ज कृती

 

आजकाल एकाच वेळी दोन जणांशी नाती ठेवल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत. सोशल मीडियावर विश्वासाला तडा जाणारी एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, आपल्या पत्नीला दारासमोर पाहताच तो घाबरतो आणि वारंवार तिची माफी मागतो. तो आपल्या प्रेयसीला जाऊ देण्याची विनंती करतो. पण, पतीने केलेल्या त्या विश्वासघातामुळे पत्नी खूप दुखावली आणि नवऱ्याची प्रेयसीला जाऊ देण्याची निर्लज्जपणे केलेली विनंती ऐकून ती आणखी संतापते. ती पतीला म्हणतेय की, “अशा कृत्यानंतर जगण्याचा अधिकार नाही; मरून जावे.” कॅमेऱ्यात पत्नीचा राग आणि असहायता स्पष्टपणे दिसून येते. संमिश्र भावनांनी भरलेल्या या व्हिडीओत एकीकडे पत्नीचा तुटलेला विश्वास दिसतोय आणि दुसरीकडे पतीची लाजिरवाणी अवस्थाही दिसून येतेय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

 

इथे पहा व्हायरल व्हिडिओ

Leave a Comment