सध्या मे महिना सुरू आहे. त्यामुळे बाजारात जिकडे तिकडे विविध प्रकारचे आंबे पाहायला मिळत आहेत. बरं, आंबा हे एक असं फळ आहे जे वर्षाचे बारा महिने मिळत नाही. त्यामुळे आंब्यांचे दर हे कायम गगनाला भिडलेले असतात. आणि हे दर टीकवण्यासाठी शेतकऱ्यांना आंब्याची सुद्धा तितकीच काळजी घावी लागते. आंबे झाडावरून काढून पेटीत भरेपर्यंत त्यांना एखाद्या लहान बाळाप्रमाणे सांभाळावं लागतं. काही वेळा तर आंबे झाडावरून काढताना खाली पडतात आणि खराब होतात. पण हे नुकसान टाळण्यासाठी एका तरुणानं भन्नाट जुगाड शोधून काढला आहे. प्लास्टिकच्या रिकाम्या बाटलीपासून त्यानं एक असं गॅजेट तयार केलेय जे पाहून तुम्ही सुद्धा दंगच व्हाल.
Land record | 1956 पासूनचा जमिनी मूळ मालकाच्या नावावर होणार! सरकारचा मोठा निर्णय..!
आंबा काढताना साधारणपणे जाळीचा वापर केला जातो. एक काठी असते त्याला पुढे चाकू लावला जातो. आणि या चाकूभोवली एक जाळी असते. चाकू आंब्याचा देठ कापतो आणि मग आंबा जाळीत पडतो. पण या प्रोसेसमध्ये काही वेळा आंबा खाळी पडण्याची देखील भिती असते. पण यावर तोडगा म्हणून एका तरुणानं बाटलीपासून असं एक गॅजेट तयार केलाय. ज्याचा वापर करून तुम्ही कुठलंही फळ सुरक्षितरित्या झाडावरून खाली उतरवू शकता. चला तर मग शाब्दिक वर्णन वाचत बसण्यापेक्षा थेट तो व्हिडीओच पाहूया.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा