शेतात भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी या शेतकऱ्याने भन्नाट आयडिया लावली आहे. शेतात काम करणारे शेतकरी या व्हिडिओत दिसून येत आहेत. विशेष म्हणजे शेतातील भुईमुगाच्या शेंगा काढणीसाठी आल्यानंतर ते झाड जमिनीतून उपटून घेतल्यानंतर चक्क दुचाकीच्या सहाय्याने या शेंगा वेगळ्या करण्यात आल्या आहेत. जुगाडू लाईफ हॅक्स या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला आणि पुरुष शेतकरी शेतात काम करताना दिसत आहेत. त्यांजवळ एक स्पेंडर दुचाकी दिसून येत असून या दुचाकीच्या चाकाचा वापर करुन ते शेंगा झाडापासून वेगळ्या करत आहेत. मानवी हातापेक्षा गाडीच्या स्पीडमुळे या शेंगा लवकर वेगळ्या होताना दिसून येते. सोशल मीडियावर नेटीझन्सला शेतकऱ्याचा हा जुगाड चांगलाच पसंत पडला आहे. इंजिनिअरची पदवी घेतेल्या विद्यार्थ्यांपेक्षाही एखाद्या शेतकऱ्याचं डोकं फास्ट चालत असतं, हेच या व्हिडिओतून दिसून येतं. शेतकऱ्यांची ही भन्नाट आयडिया सोशल मीडियावर व्हयरल होत आहे.