Video Viral | भयंकर! महाकाय शार्कने जिवंत मगरीला क्षणात गिळलं, तोंड जबड्यात पकडलं अन्…; पाहा धडकी भरवणारा VIDEO

Video Viral : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक भयानक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी जंगलात शिकार करणाऱ्या सिंहाचे, वाघाचे तर कधी साप, मगरीच्या शिकाराचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे प्राणी इतके धोकादायक आहेत की त्यांच्या एका हल्ल्यात कोणत्याही प्राण्याचा, माणसाचा मृत्यू होऊ शकतो. ते कोणताही प्राणी फाडून खाऊ शकतात. आपण अशा प्राण्यांची भणक जरी लागली तरी घाबरतो. आता मगरींबद्दल बोलायचे झाले तर हा फार भयानक प्राणी आहे, जो सिंहाचीही शिकार करायला मागेपुढे पाहत नाही. पण, सोशल मीडियावर आता मगरीच्या शिकारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक विशाल शार्क समुद्रात जिवंत मगरीला गिळताना दिसतोय. शिकारीचे हे भयानक दृश्य पाहून तुमचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.

Weather Forecast: राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल; ‘या’ तारखेपासून पाऊस ओसरणार, असा आहे १० दिवसांचा अंदाज

जंगलात जिवंत राहण्यासाठी प्राणांना खूप सतर्क असावे लागते, अन्यथा शिकारी प्राण्याचीदेखील केव्हाही शिकार होऊ शकते. असेच काहीसे या मगरीच्या बाबतीत घडले. जिवंत मगरीला शार्कने वेगाने केलेल्या हल्ल्यात स्वत:चा जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही. समुद्रातील महाकाय प्राणी म्हणून शार्क माशाला ओळखले जाते. याच शार्कने एका मगरीवर केलेला भयानक हल्ला आपण या व्हिडीओत पाहू शकतो.

breaking news new update | ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2025 महाराष्ट्र – तिसरी निवड यादी प्रसिद्ध  तुमचे नाव येथे चेक करा.

व्हिडीओत पाहू शकता की, समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत एक मगर आरामात उलटी पडून होती, पाहताना ती मृत किंवा बेशुद्ध असल्यासारखी दिसतेय. तिचे तोंड आणि पाठ पाण्याखाली आणि शरीराचा उरलेला भाग पाण्याबाहेर दिसत आहे, म्हणजे ती उलट्या अवस्थेत पडून आहे. तेवढ्यात एक शार्क मासा तिथे येतो आणि वेगाने मगरीवर हल्ला करतो. मगरीचे तोंड सरळ जबड्यात पकडून तो तिला पाण्यात ओढतो. यानंतर तो हळूहळू मगरीला जिवंत गिळू लागतो. मगर जीव वाचवण्यासाठी आपले हातपाय हलवते, पण शार्कपुढे तिचे काहीच चालत नाही. शेवटी तिला मृत्यूला कवटाळावे लागते.

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

Leave a Comment