Video Shows Rhino Wild Card Entry In wedding | एक लग्न असंही! भर मांडवात जंगली गेंड्याची एंट्री; मुलांनी काढला पळ अन्… पाहा व्हायरल VIDEO

Video Shows Rhino Wild Card Entry In wedding : लग्न म्हणजे मजा-मस्ती, भावूक क्षण, धावपळ, तर अचानक-भयानक समोर येणारी संकट यांचे मिश्रण असते. नवऱ्याची वरात घोड्यावरून तर बरेच जण लग्नात पाळीव श्वान, मांजर यांना घेऊन येतात. पण, विचार करा तुम्ही पोहचलेल्या लग्नात अचानक जंगली गेंडा आला तर काय होईल. तर आज सोशल मीडियावर हेच दृश्य दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये नेपाळच्या चितवन राष्ट्रीय उद्यानाजवळील एका लग्नात नेमके हेच घडले आणि गेंड्याची अनपेक्षित एंट्री झाली आहे.

 

व्हायरल व्हिडीओ नेपाळच्या चितवनमधील सौराहा येथील आहे. लग्नसोहळा अगदी उत्साहात पार पडत असतो. पण, अचानक लग्नस्थळी एक जंगली गेंड्याची एंट्री होते. गेंड्याने अचानक प्रवेश केल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच उत्साह निर्माण झालेला दिसतो आहे. जंगली गेंडा आधी हळूहळू गेटपाशी उभा राहतो. नंतर हळूहळू आतमध्ये येतो. गेंड्याने गेटमधून प्रवेश करताच लहान मुलांनी पळ काढला तर मोठी मंडळी मोबाईल काढून व्हिडीओ शूट करू लागली. त्यानंतर गेंडा बाजूला असणाऱ्या गार्डनमध्ये प्रवेश करताना दिसून आला.

 

लग्नात वाईल्ड कार्ड एंट्री (Viral Video)

लग्नमंडपात अनपेक्षितपणे आलेला गेंडा गोंधळलेला नाही तर उत्सुक दिसत होता. लग्नातील पाहुण्यांची गर्दी पाहून तो आकर्षित झाला की वधू-वरांना शोधतो तो मंडपात शिरला? नक्की तो तिथे काय करायला आला कोणालाही माहिती नाही. पण, तो लग्नमंडपात अशा प्रकारे शिरला जणू काही त्याला लग्नाचे आमंत्रणच दिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडीओची प्रचंड चर्चा होते आहे. तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघाच…

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

Leave a Comment