Snake Viral Video | साप किती वेगाने पळू शकतो तुम्ही कधी पाहिलेय का? VIDEO पाहून बसेल व्हाल शॉक

Snake Viral Video : साप खडबडीत जमिनीवर वेगाने सरपटताना दिसतात. त्याशिवाय ते पाण्यातही पोहू शकतात. पण, सध्या सोशल मीडियावर सापाचा असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यातील सापाचा वेग पाहून तुम्हीही थक्क व्हाल. त्यात साप इतक्या वेगाने सरपटताना दिसतोय की, सोशल मीडियावर व्हिडीओ पाहणारे लोकही आश्चर्यचकित झालेत.

Pune Car Hit To MPSC Students | अपघात नव्हे भविष्यावर घाव! पुण्यात MPSC च्या १२ विद्यार्थ्यांना कारनं उडवलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक साप मातीत खूप वेळ पडून आहे. बघताना त्या सापाचा मृत्यू झालाय की काय, असे दिसतेय. कारण- बरात वेळ तो शरीराची काहीच हालचाल करीत नाही. पण, ज्यावेळी एक व्यक्ती काठीने त्या सापाला उचलण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी तो कोणत्या तरी परदेशी भाषेत काहीतरी बोलतोय. पण, त्याच वेळी साप अचानक हालचाल करू लागतो आणि तो इतक्या वेगाने पळतो की, क्षणात नजरेसमोरून गायब होतो. ४८ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये साप अतिशय वेगाने सरपटताना दिसतोय.

 

सापाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एक्सवर @AMAZlNGNATURE नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी या सापाबद्दल प्रश्नही विचारले आहेत.

 

युजर्सच्या कमेंटस्

 

 

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की, मी सापांना खूप वेगाने धावताना पाहिले आहे. मी एकाला दुसऱ्याचा पाठलाग करताना पाहिलेय; पण ते वेगवेगळ्या प्रजातीचे साप होते. दुसऱ्या युजरने लिहिलेय की, एवढा वेगवान साप पहिल्यांदाच पाहत आहे. तिसऱ्या युजरने लिहिले की, हा साप खूप वेगवान आहे.

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment