Woman Chia Pet Toilet Video Viral | “अरे ही वेडी झालीय का?” टॉयलेट सीट्सपासून बेसिनपर्यंत सगळीकडे लावली चिया सीड्सची रोपं अन्…; पाहा VIDEO

Woman Chia Pet Toilet Video Viral : हौसेला मोल नाही हे म्हणतात ते काही खोटं नाही, लोक आपली हौस पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबताना दिसतात. अशाचप्रकारे एका तरुणीने आपली हटके हौस पूर्ण करण्यासाठी बाथरुममध्ये असं काही केलं की पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या तरुणीने बाथरुममध्ये जागोजागी फक्त चिया सीड्सची रोपं लावून ठेवली आहेत, त्यामुळे अनेकांनी, अरे ही वेडी तर झाली नाही ना असे म्हटले आहे. तर अनेकांना प्रश्न पडला आहे की, तरुणीने बाथरुममध्ये असं नेमकं का केलं असेल.

 

बाथरुम कमी आणि गार्डन अधिक

या तरुणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात तुम्हाला दिसेल की, तिने बाथरुममधील बाथ टबपासून सिंक स्लॅब ते अगदी टॉयलेट सीटपर्यंत सगळीकडे चिया सीड्सच्या बिया पेरल्या आहेत. यानंतर तिने या सगळीकडे पेरलेल्या चिया सीड्सना ६ ते ७ दिवस नियमित पाणी दिले. ती रोज कशाप्रकारे या बियांवर पाण्याची फवारणी करत होती तेही व्हिडीओत दाखवले आहे. अखेर या सीड्समधून ७ दिवसांनी छोटी रोपं खुलतात. यामुळे ते बाथरुम कमी आणि गार्डन अधिक दिसत होतं. कारण सगळं बाथरुम चिया सीड्सच्या रोपांमुळे हिरवंगार दिसत होतं. पण, तरुणी इथपर्यंतच थांबली नाही, तिने चक्क खास चिया सीड्सच्या रोपांपासून नखं बनवली होती. तरुणीचा हा वेडेपणा पाहून युजर्सही चकित झाले आहेत.

Ahmedabad Shooter Abhishek | “शरण जाण्यापेक्षा मरणं चांगलं”, पोलिसांपासून वाचण्यासाठी गुन्हेगार चढला पाचव्या मजल्यावर; हाय व्होल्टेज ड्राम्याचा VIDEO व्हायरल

 

Leave a Comment