Breaking news new update | जलसंपदा विभागांत नवीन जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध  आजचं अर्ज दाखल करा.

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत, अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी वैजनाथ यांच्या आस्थापनेवर करार पद्धतीने सेवानिवृत्त अभियंत्यांची तात्पुरती नेमणूक करण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. आपण जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त झालेले स्थापत्य अभियंता असाल आणि पुन्हा एकदा राष्ट्रसेवेत योगदान देण्यास इच्छुक असाल तर ही संधी आपल्यासाठी आहे.

ST bus fares | एसटी बस दरात मोठी वाढ नवीन दर जाहीर! येथे पहा नवीन दर 

बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यांतील विविध कार्यालयांतर्गत विशिष्ट कामांसाठी एकूण सात (०७) अनुभवी अभियंत्यांची आवश्यकता आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी-२, उप विभागीय अधिकारी, आणि उप विभागीय अभियंता या संवर्गातून सेवानिवृत्त झालेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची पात्रता आणि मुदत अर्जदार हे जलसंपदा विभागातून संबंधित पदांवरून सेवानिवृत्त झालेले असावेत आणि त्यांची वयोमर्यादा ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावी. निवड झालेल्या उमेदवारांची नेमणूक ११ महिन्यांच्या कालावधीसाठी असेल.

 

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया २६ मे २०२५ पासून सुरू झाली असून, अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत १३ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने खालील पत्त्यावर पाठवावेत:

PM Kisan installment | शेतकऱ्यांसाठी खुशखबर, PM किसान हप्ता ‘या’ तारखेला मिळणार 2000 हजार रुपये

अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी वैजनाथ, जि. बीड.

ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने, पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा. अधिक तपशिलासाठी कृपया मूळ जाहिरात पहावी.

Leave a Comment