देसी गर्ल प्रियांका चोप्राचे लाखो चाहते आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात प्रियाकांचे अनेक चाहते आहेत. बॉलीवूडसह हॉलीवूडमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या प्रियांका चोप्रा मात्र छत्तीसगडमधील एका १६ वर्षीय मुलीची चाहती असल्याचे समोर आले आहे. १६ वर्षीय मुलीने एका जुन्या बॉलीवूड गाण्यावर बेली डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे जो देसी गर्ल प्रियांका चोप्राला आवडला आहे. तिला या मुलीचा डान्स इतका आवडला की प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे.
छत्तीसगडमधील १६ वर्षीय लावण्या दास माणिकपुरी ही एक डान्सर आहे. तिने स्वत:च सराव करून हे कौशल्य आत्मसात केले आहे. एवढंच नाही ती बेली डान्स देखील उत्तम करते. नुकताच सोशल मीडियावर लावण्याने बेली-डान्सचा व्हिडिओ शेअर केला जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे. तिचा डान्स पाहून केवळ जगभरातील सोशल मीडिया वापरकर्त्यांनाच नव्हे तर जागतिक आयकॉन प्रियांका चोप्रालाही प्रभावित केले आहे.
CIBIl Scor | बँकांचे कर्ज घेताना महत्त्वाचा असलेला सीबील स्कोर म्हणजे काय? तो कसा चेक करायचा?
आशा भोसले यांनी गायलेल्या ‘पिया तू अब तो आजा’ या आयकॉनिक बॉलीवूड गाण्यावर आधारित या लावण्याने अप्रतिम बेली डान्स केला आहे. लावण्या अत्यंत आत्मविश्वासाने डान्स करत आहे. तिचे हावभाव, तिच्या अदा सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. तरल खरं तर, ती इतका चांगला बेली डान्स करत आहे पाहणाऱ्याची नजर तिच्यावरून हटत नाही. इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आणि लाखो व्ह्यूज मिळाले, विशेषतः चोप्राने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर व्हिडिओ शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ आणखी चर्चेत आला.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा