महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात (Dearness Allowance – DA) १२% वाढ केली आहे. ही वाढ १ जुलै २०२४ पासून लागू होईल, ज्यामुळे महागाई भत्ता ४४३% वरून ४५५% झाला आहे. या निर्णयामुळे सुमारे १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होईल. फेब्रुवारी २०२५ च्या वेतनासोबत १ जुलै २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीचा थकबाकी महागाई भत्ता रोख रकमेच्या स्वरूपात दिला जाईल .
Farmer Loan Waiver | शेतकरी कर्जमाफी होणार! पण अटी काय असणार? मंत्री बावनकुळेंनी सविस्तर सांगितलं
या वाढीचा फायदा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच, ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन ५व्या वेतन आयोगाच्या अनिर्धारित वेतनमानानुसार आहे, त्यांनाही होईल. सरकारी आदेशानुसार, महागाई भत्त्याच्या वितरणाच्या विद्यमान प्रक्रिया आणि तरतुदी भविष्यातही लागू राहतील .
या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल आणि महागाईच्या वाढत्या दरांपासून दिलासा मिळेल. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
predicts heavy rain | पुढील एवढ्या दिवस या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पंजाब राव डख यांचा अंदाज