Viral Video : क्रिकेट खेळताना मैदानावर अनेकदा अशा गोष्टी घडतात, ज्याचा आपण विचारही करत नाही. कधी कोणी हटक्या पद्धतीने चौकार, षटकार मारतो तर कोणी अनोख्या पद्धतीने कॅच पकडतो. कधी कधी असं काही घडतं की विश्वास बसत नाही.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्र प्रिमियर लिग (MPL 2025) दरम्यानचा आहे, जो सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की धाव घेताना दोन फलंदाजामध्ये जोरदार टक्कर झाली पण या टक्करनंतर प्रतिस्पर्धी संघाने स्पोर्ट्समनशिप न दाखवता दोन्ही फलंदाजांना रनआउट करण्याचा प्रयत्न केला. पण फलंदाज आपापल्या क्रीझमध्ये परतले. विशेष म्हणजे बाद करण्याच्या नादात ओव्हर थ्रो चौकार फलंदाजांच्या पदरी आला. जे बाद करत होते त्यांच्या हातून फोर गेला.
शुक्रवारी पुण्यात महाराष्ट्र प्रिमियर लिगच्या एलिमिनेटरमध्ये रायगड रॉयल्सने कोल्हापूर टस्कर्सला विकेट्सनी हरवले. या सामन्यादरम्यान रायगडच्या फलंदाजांनी दोन रन काढण्याचा प्रयत्न केला पण दुसरी रन काढताना दोघांची नजर चेंडूवर होती त्यामुळे धावताना त्यांची आपापसात टक्कर झाली. दोन्हीही फलंदाज पडले. पण यावेळी विरुद्ध कोल्हापूर टीमने स्पोर्ट्समनशिप स्पिरीट दाखवली नाही आणि फलंदाजांना मदत केली नाही. उलट या परिस्थितीचा फायदा उचलत दोन्ही फलंदाजांना रनआउट करण्याचा प्रयत्न केला पण आउट करण्याच्या नादात त्यांच्या ओव्हर थ्रोचा फायदा फलंदाजांना झाला.