Cobra Viral Video | बापरे! पृथ्वीवरचा रियल नागराज! २० फूट साप माणसासारखा उभा राहिला; VIDEO पाहून सर्वांनाच भरेल धडकी

King Cobra Standing Tall Video: साप म्हटलं की, अंगावर शहारा येतो. साप पाहिलं तरी अनेकांची बोबडी वळते. अशातच जर साप विशालकाय आणि विषारी असेल, तर आणखीच घाबरगुंडी उडू शकते. मग तो किंग कोब्रा असेल, तर भीतीचा स्तर दुपटीने वाढतो. सध्या सोशल मीडियावर किंग कोब्राचा असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हा विषारी साप आपलं शरीर उंचावून अक्षरशः एखाद्या माणसासारखा उभा राहतो आणि फणा फडफडवतो. हा अविश्वसनीय व्हिडीओ पाहून अनेकांचं काळीज थरथरलं आहे.

 

जगातील सर्वांत विषारी सापांच्या यादीत किंग कोब्रा अव्वल स्थानी आहे. किंग कोब्रा हा अत्यंत धोकादायक साप म्हणून ओळखला जातो. एका दंशात तो इतकं विष सोडतो की, एखाद्या माणसाचा मृत्यू काही मिनिटांत होऊ शकतो. त्यामुळे कोब्रा दिसताच शक्य तितक्या लांब राहणंच योग्य ठरतं. 

 

सोशल मीडियाचं जगही खूप विचित्र आहे. इथे एखादा व्हिडीओ कधी व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अनेक वेळा असे धक्कादायक व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यावर लोकांना विश्वास ठेवणं कठीण जातं. सोशल मीडियावर सध्या प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप उडेल असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ X (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @gunsnrosesgirl3 या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. केवळ १० सेकंदांच्या या व्हिडीओनं हजारो लोकांना खिळवून ठेवलं आहे. व्हिडीओमध्ये एक विशालकाय किंग कोब्रा जमिनीवरून आपल्या शरीराचा मोठा भाग उचलतो आणि आक्रमकतेनं फणा उभारतो. हा क्षण पाहणाऱ्यांना काही क्षणांसाठी श्वास रोखावा लागेल, इतका तो अंगावर येणारा आहे.

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment