साप आणि मुंगूस यांचं वैर कुणाला माहीत नाही? एकमेकांचा श्वासही सहन न करणारे हे दोन जीव पुन्हा आमने-सामने आले आणि मग सुरू झाली एक जीवघेणी लढाई. जिथे एक जण वाचण्यासाठी झगडतोय, तर दुसरा संपवण्यासाठी. सध्या सोशल मीडियावर असाच थरारक VIDEO व्हायरल होत आहे, ज्यात मुंगूस सापाला पाहताच राक्षसी वेगाने हल्ला चढवताना दिसतो. विषारी साप फणा काढून उभा असतो; पण समोर उभा असतो निर्भीड व आक्रमक मुंगूस, ज्याच्यासमोर सापाचं विषही निष्प्रभ ठरतं. पुढे काय घडलं हे पाहताना तुमच्याही श्वासाचा वेग वाढेल… आणि तुम्ही म्हणाल, “हे तर निसर्गाचं युद्ध आहे”.
जगातले दोन कट्टर शत्रू एकमेकांसमोर आले आणि मग जे झालं, ते थरारक होतं. मुंगूस आणि साप यांच्यांतील शत्रुत्व जुनं आहे. जंगल असो वा मोकळं मैदान; जर मुंगुसाच्या नजरेस एखादा साप पडला, तर तो जिवंत सुटणं जवळपास अशक्यच. आणि असाच एक थरारक भिडंत सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय, जिथे मुंगूस आणि नागराजामध्ये मृत्यूपर्यंत संघर्ष सुरू होतो.
land record | जमीन वर्ग-2 चे रुपांतर जमीन वर्ग -1 मध्ये कसं केले जाते? अर्जप्रक्रिया वाचा सविस्तर
हा व्हिडीओ @pintushani7800 या इन्स्टाग्राम युजरनं शेअर केला आहे. त्यात एका मोकळ्या मैदानात एक गाय बांधलेली दिसते आणि त्या ठिकाणी एक नाग सरपटत पुढे जात असतो. इतक्यात मुंगुसाची नजर नागावर पडते… आणि पुढच्याच क्षणी मुंगूस तुफानी वेगानं नागावर झडप घालतो.
मुंगुसाने नागाच्या फण्याला चावून पकडून ठेवलेलं दिसतं. नाग स्वतःला सोडवण्यासाठी धडपड करत असतो. काही क्षणांसाठी तो सुटतोही; पण मुंगूस पुन्हा त्याला पकडतो आणि एकदाचा जीव घेतल्याशिवाय सोडत नाही. अखेरीस मुंगूस तो साप उचलून घेऊन जाताना दिसतो.
हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. त्याला ३४ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये युजर्सनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी म्हणतं, “इतिहास साक्ष आहे की, कॅमेरामन कधी कोणाला वाचवत नाही.”तर कुणी लिहिलं, “भाऊ, व्हिडीओ काढण्याऐवजी वाचवलं असतं, तर बरं झालं असतं”, तिसरा युजर लिहितो, “कोब्रा असो वा कोणताही साप… मुंगुसासाठी तो फक्त स्नॅक्स आहे.”
येथे पाहा व्हिडीओ