Snake Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये सापाची जी अवस्था दाखवली आहे, ती पाहून कोणाचंही काळीज थरथरेल. सापाची भीती तर सर्वांनाच वाटते. पण, या व्हिडीओमधील भीती ही त्याच्या वेदनेची आहे आणि ती माणसांनीच निर्माण केलेली आहे. सोशल मीडियावर सध्या एक असाच सापाचा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे, जो केवळ भीतीदायकच नाही, तर अंतर्मन हादरवणारा आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारी दृश्यं पाहून तुम्हालाही क्षणभर वाटेल माणूस अधिक भयानक आहे की साप?
सामान्यतः साप पाहिला की लोक ओरडतात, धावत सुटतात. पण, या व्हिडीओत दिसणारा साप ना कोणावर हल्ला करत आहे, ना फणा उगारतोय… तरीही त्याचे हाल बघून अंगावर काटा येतो. व्हिडीओ पाहून जाणवेल खरं शिकार कोण आहे? एक साप, जो निसर्गाचा अत्यंत शांत आणि संवेदनशील जीव… तो इतक्या वेदनादायक अवस्थेत दिसतो आहे की, डोळ्यांत अश्रू येतील. हा व्हिडीओ केवळ एक दृश्य नाही, तर आपल्या बेपर्वाईची लाजिरवाणी साक्ष आहे.
व्हिडीओमध्ये एक साप वेड्यासारखा जमिनीवर इकडे तिकडे पळताना दिसतोय. सुरुवातीला कळत नाही, पण नंतर लक्षात येतं की, त्याच्या डोक्यावर प्लास्टिकच्या बाटलीचं झाकण किंवा तोंड घट्ट अडकलेलं आहे, त्यामुळे त्याला काही दिसत नाही, तो दिशाभूल होतोय, घाबरतोय आणि वेदनांनी तडफडतोय. त्याच्या शरीराच्या हालचालींवरून तो किती त्रासात आहे हे सहज समजतं
ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली?
प्लास्टिकसारखा विघटन न होणारा कचरा जंगलात, मोकळ्या परिसरात, नाल्यांत फेकणं… ही सवय निसर्गासाठी आता शाप बनली आहे. त्या बिचाऱ्या सापाने ना कधी कुणाला त्रास दिला, ना कुठली मागणी केली. पण, तरीसुद्धा आपल्या चुकीमुळे त्याचं जीवन संकटात आलं. त्याच्या हालचाली घाईच्या… पण डोळ्यांसमोर अंधार. श्वास घेणं कठीण आणि ह्या साऱ्या त्रासामागे कारण काय? माणसाने फेकलेली प्लास्टिकची बाटली. एक व्हिडीओ, ज्यात दिसतंय निसर्गावर माणसाने ओढवलेलं दुःख असहाय सापाची तडफड. हा व्हिडीओ बघितल्यावर तुम्ही कधीही प्लास्टिक सर्रास फेकणार नाही.
व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका युजरने लिहिलं, “प्रकृती आता आपली चूक भोगते आहे” दुसऱ्याने म्हटलं, “प्लास्टिक फक्त माणसांसाठी नाही, प्राण्यांसाठीही मृत्यू ठरतोय”, तिसरा युजर लिहितो, “हा साप नाही, ही आपली बेफिकिरी तडफडते आहे…”
तडफडणाऱ्या सापाचा व्हिडीओ पाहून काळीज हादरेल!