Hot Air Balloon Caught fire Video | बापरे हे चाललंय तरी काय? विमान अपघातानंतर आता हॉट एअर बलूनला आग; २१ जण जमिनीवर कोसळले ८ जणांचा जागीच मृत्यू, भयंकर VIDEO समोर

Hot Air Balloon Caught fire Video: इतिहासाची पुनरावृत्ती फार कमी वेळा घडते. एखादी घटना पुन्हा तशीच घडणं दुर्मीळ समजलं जातं. पण एखाद्या वर्षात घडलेल्या घडामोडी त्याच प्रकारे घडू लागल्या तर? एखाद्या वर्षाचं कॅलेंडर अगदी आधीच्याच कॅलेंडरसारखंच असेल तर? सध्या घडत असलेल्या घटना पाहता हा प्रश्न निर्माण होतो. अहमदाबाद मधील मेघानी येथे एअर इंडियाचा विमानाला उड्डाणा नंतर झालेल्या विमान अपघातात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. याच दरम्यान आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.ब्राझीलच्या दक्षिणेकडील सांता कॅटरिना राज्यात एक भयानक अपघात घडला आहे.

aditi tatkare | लाडकी बहीण योजनेचे 3000 हजार तुमच्या बँक खात्यात झाले जमा यादीत नाव चेक करा 

स्थानिक आणि राज्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी कॅटरिना येथे २१ प्रवाशांना घेऊन जाणारा एक गरम हवेचा फुगा अर्थात हॉट एअर बलून कोसळला, ज्यात किमान आठ जणांचा मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले आहेत. व्हायरल व्हिडिओत हॉट एअर बलूनला लागलेली आग स्पष्टपणे दिसून येत आहे. याशिवाय आग लागलेल्या हॉट एअर बलूनमधून काही लोक खाली पडताना पाहायला मिळत आहेत. हजारो फूट ऊंचावरून कोसळल्यानंतर या हॉट एअर बलूमध्ये बसलेल्या आठ जणांचा जागेवरच मृत्यू झालाय. व्हायरल व्हिडीओमध्ये हॉट एअर बलूनला आग लागल्यानंतर त्या बलूनच्या खालचा भाग (बेस) एखाद्या रॉकेटप्रमाणे खाली येताना दिसतोय. तर वरचा बलूनच्या भागाला आग लागल्यामुळे तो जळताना दिसतोय. बलूनच्या बेसमध्ये बसलेले लोकही खाली कोसळताना दिसत आहेत.

Viral Video | कर्माचे फळ लगेच भोगावे लागले! रन बनवताना फलंदाजांची झाली टक्कर; धाडकन् खाली पडले, फिल्डिंग टीमने दाखवली नाही माणूसकी, पुढे जे घडले…

राज्य अग्निशमन विभागाच्या हवाल्यानं रॉयटर्सनं दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं की हॉट एअर बलून दुर्घटना शनिवारी सकाळी घडली. हॉट एअर बलूनला आग लागल्यानंतर तो ब्राझीलच्या प्राइया ग्रेंडे शहरात क्रॅश झाला. सँटा कॅटेरिना मिलिट्रीच्या फायर ब्रिगेडच्या हवाल्यानं असोसिएट प्रेसनं त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं की हॉट एअर बलून राइड क्रॅश झाल्यानंतर जखमींना तातडीनं रुग्णालयात पाठवण्यात आलं. हॉट एअर बलूनच्या साहसी राइडसाठी ब्राझीलमधील प्राइया ग्रैंडे शहर प्रसिद्ध आहे.

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

Leave a Comment