King Cobra Video Viral | फणा काढून बसलेल्या किंग कोब्राला तरुणानं केलं किस, VIDEO पाहून लोक हैराण; म्हणाले, “जीवघेणा…”

Video Viral : जगातील सर्वात विषारी सापांच्या यादीत किंग कोब्रा अव्वल स्थानी आहे. कारण किंग कोब्राच्या विषाने जवळपास २० जणांचा मृत्यू होऊ शकतो. पण, तरीही अनेक लोक या सापाशी जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसतात. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी ते स्वत:च्या जीवाशी खेळतात. दरम्यान, किंग कोब्राचे अनेक खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती चक्क भल्या मोठ्या किंग कोब्राला किस करताना दिसतेय. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

 

ज्या सापाला पाहून लोक १०० पावलं दूर पळतात त्या किंग कोब्राच्या डोक्यावर हा तरुण किस करतोय, त्यामुळे व्हिडीओ पाहतानाही भीती वाटतेय. तरुणाचे किंग कोब्राविषयीचे हे प्रेम पाहून लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी म्हटले की, जर किंग कोब्राने प्रत्युत्तर दिले तर तरुणाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. हा व्हिडीओ ग्रामीण भागातील असल्याचे सांगितले जात आहे.

 

किंग कोब्राच्या तोंडाजवळ गेला अन्…

व्हिडीओत पाहू शकता, एक तरुण रस्त्यावर फणा काढून बसलेल्या किंग कोब्रा सापाजवळ आरामात जातो. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती दिसत नाही. उलट अति आत्मविश्वासात तो त्याच्याजवळ जातो. त्याच्यासाठी किंग कोब्रा जणू काही कोणतातरी पाळीव प्राणी आहे असे वाटते. यानंतर तो अगदी किंग कोब्राच्या तोंडाजवळ जातो आणि त्याच्या डोक्यावर किस करतो, फणा काढून बसलेला हा साप कोणत्याही क्षण हल्ला करेल अशा स्थिती आहे. पण, तरीही न घाबरता या तरुणाने आतापर्यंत किंग कोब्रा सापांच्या डोक्यावर चुंबन घेतलं आहे. सापांच्या रेस्क्यूदरम्यान तो हे प्रकार करत असल्याचे सांगितले जाते.

 

Aditit Tatkare list | लाडकी बहिण योजनेत नवीन नियम; फक्त या महिलांना मिळणार 500 रुपये महिना

इंडियन स्पेक्टेकल्ड कोब्रा हा अत्यंत विषारी साप आहे. त्याचे न्यूरोटॉक्सिन विष ४० मिनिटांत कोणत्याही प्रौढ हत्तीचा जीव घेऊ शकते, मग माणसाचे काय होईल? याचा फक्त विचार करा. अशा परिस्थितीत जर कोब्राने मागे वळून त्या तरुणावर हल्ला केला तर त्याला आपला जीव गमवावा लागू शकतो, त्यामुळे व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स त्या तरुणाला असं न करण्याचा सल्ला देत आहेत.

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

Leave a Comment