King Cobra Video Viral | किंग कोब्राला जंगलात सोडायला गेला अन् तरुणाबरोबर घडली भयंकर घटना…; Video पाहून भरेल धडकी

King Cobra Shocking Video : जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात. त्यातील किंग कोब्रा ही प्रजात विषारी मानली जाते, कारण या सापाच्या एका दंशाने काही मिनिटांत माणसाचा मृत्यू होऊ शकतो. केवळ माणूसच नाही तर अनेक प्राणीदेखील किंग कोब्रापासून अंतर ठेवून राहतात. यात आता पावसाळा सुरू असल्याने खेड्या पाड्यात मानवी वस्त्यांमध्येही या सापांची दहशत पाहायला मिळतेय. अनेकदा त्यांना रेस्क्यू करणंही कठीण जातं. सध्या अशाच एक किंग कोब्राचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

13th installment | लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 13वा हप्ता जमा होणार या तारखेला 

कारण ज्या किंग कोब्राचं नाव ऐकूनसुद्धा आपल्याला भीती वाटते, तोच साप चक्क एका व्यक्तीचा पाठलाग करू लागला. हेच दृश्य या व्हिडीओत पाहायला मिळतेय. त्याचं झालं असं, एका घरातून रेस्क्यू करून आणलेल्या किंग कोब्राला एक तरुणाने जंगलात सोडलं, पण साप उलटा फिरून तरुणाच्या मागे लागला. अनेक अंतर त्याने तरुणाचा पाठलाग केला.

 

किंग कोब्रा ३.३ मीटर प्रति सेकंद वेगाने धावू शकतो. जो सामान्य माणसासाठी खूप वेगवान आहे, त्यामुळे किंग कोब्राच्या तावडीत एकदा सापडलं की सुटणं फार कठीण असतं. पण, या व्हिडीओत साप आकाराने फारचं लहान असल्याने तरुणाला वेगाने तिथून पळ काढता आला.

 

व्हिडीओत पाहू शकता, तरुण एका बरणीतून रेस्क्यू केलेल्या किंग कोब्राला जंगलात नेऊन सोडतो; पण किंग कोब्रा बरणीतून बाहेर येताच फणा काढून अतिशय वेगाने मागे फिरतो आणि थेट तरुणाचा पाठलाग करू लागतो. तरुणाची सावली जशी पुढे जाते, अगदी त्याच दिशेने सापही वेगाने सरपटत जातोय; हे दृश्य खरंच पाहताना फार भयावह वाटतेय.

 

Leave a Comment