Viral Video: पावसाळा सुरू झाला की, निसर्गात केवळ हिरवळच डोकावत नाही, तर धोकादायक पाहुणेही आपल्या आसपास वावरायला लागतात. विशेषतः जमिनीखालचे जीव, ज्यात सापांचा वावर सर्वाधिक असतो, ते आपली सुरक्षित बिळं सोडून बाहेर पडू लागतात. ओलसरतेपासून वाचण्यासाठी हे सरपटणारे प्राणी कोरड्या जागेचा शोध घेतात आणि मग हेच साप घर, गॅलरी, बाथरूम, दुकान, शेत किंवा अगदी तुमच्या स्वयंपाकघरातही सहज दिसू शकतात.
Breaking news new update | कंत्राटी कामगार अनुदान योजना कामगारांना मिळणार ३० लाखांपेक्षा जास्त मदत
आता पावसाळा सुरू असून, त्यासोबतच एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये जे दिसतं, ते पाहून कोणीही हादरून जाईल. एका घराच्या स्वयंपाकघरात जे आढळून आलंय, ते पाहून तुम्हीही हादरून जाल हे मात्र नक्की. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या…
ladki bahin yojana june hafta | लाडकी बहीण जून हप्ता राहिलेल्या सर्व जिल्ह्यात पुन्हा वाटप सुरू
पावसाळा सुरू झाला की साप, विंचू यांसारख्या जीवांचा वावर वाढतो, हे आपण ऐकत आलोय… पण जर एखाद्या दिवशी तुमच्या घरात, तेही अगदी स्वयंपाकघरातील गॅसच्या शेगडीमध्ये एक जिवंत कोब्रा लपून बसलेला आढळला तर? अशक्य वाटतं ना? पण सध्या सोशल मीडियावर अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होत आहे. गॅस स्टोव्ह उघडताच जे दिसलं, ते पाहून घरातल्यांचंच नाही, तर हा व्हिडीओ पाहणाऱ्यांचेही हात-पाय गळून पडले. साप कोणत्याही दरवाजात वा कोपऱ्यात नव्हता… तर थेट गॅस शेगडीच्या आतमध्ये कुंडली मारून बसलेला होता.
व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, घरातील व्यक्ती जेव्हा गॅसचं झाकण उघडतं, तेव्हा त्याला आतमध्ये एक मोठा जिवंत साप कुंडली मारून बसलेला सापडतो. इतक्या सुरक्षित वाटणाऱ्या घराच्या आतच, अगदी जेवण बनवायच्या गॅसच्या शेगडीमध्ये असा साप लपून बसला असेल, हे कुणाच्या लक्षात येणं कठीण आहे.
पावसाळा सुरू झाल्यावर साप हा ओलसर जागा टाळून कोरड्या आणि उबदार ठिकाणांचा शोध घेतात. जंगल, शेत यांसारख्या त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानांमध्ये पाणी साठल्यावर ते माणसाच्या रहिवासी भागांकडे वळतात. त्यामुळे अशा दिवसांत साप बाथरूम, किचन, स्टोअररूम, गाड्या इत्यादी ठिकाणी शिरतात. त्यांना उबदार आणि सुरक्षित जागा मिळाल्यावर ते तिथे लपून बसतात.
Breaking news new update | कंत्राटी कामगार अनुदान योजना कामगारांना मिळणार ३० लाखांपेक्षा जास्त मदत
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही सावध राहण्याबाबतच्या सूचनात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. “हा एक इशारा आहे. घरात विशेषतः स्वयंपाकघरामध्ये अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे,” असे काहींनी म्हटले. तर काहींनी, “गॅस स्टोव्ह, सिंक आणि घराच्या कोपऱ्यांची वेळोवेळी तपासणी करा,” असा सल्लाही दिला.
तुमच्या घरात साप आढळल्यास, घाबरून न जाता तत्काळ वन विभाग किंवा सर्पमित्रांशी संपर्क साधा. सापाला हात लावू नका किंवा स्वतःहून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका.
येथे पाहा व्हिडीओ