Pune Video : सध्या महाराष्ट्रात अनेक शहरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे मुंबईत तर पावसाने कहर केला आहे. गेल्या दोन तीन दिवसामध्ये पुण्यात पावसाचा जोर वाढलेला दिसून येत आहे. अशात सोशल मीडियावर पुण्यातील पावसाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेक जण त्यांचे अनुभव व्हिडीओच्या माध्यमातून शेअर करताना दिसत आहे.
पाऊस म्हटलं की घराबाहेर कसं पडावं, हा सर्वात मोठा प्रश्न असतो पण नोकरी आणि शिक्षणासाठी तारेवरची कसरत करत पावसात बाहेर पडावं लागतं. अशा परिस्थितीत ये जा करण्यासाठी महानगरपालिकेच्या बसेस अधिक उपयोगी ठरतात पण तुम्ही कधी वॉटर बस पाहिली आहे का? जर नाही, तर हा व्हिडीओ पाहा.
या व्हिडीओत तुम्हाला रस्त्यावरील पाणी थेट बसमध्ये शिरताना दिसेल. पुण्यात एवढा पाऊस आहे की थेट चालत्या बसमध्ये पाणी शिरताना दिसते. हे दृश्य इतके भयानक आहे की पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईन.