सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय भांडणाचे देखील अनेक व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. सध्या असाच एक शिक्षिकांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओने अनेकांना प्रश्न पडला आहे की, मुलांना शाळेत शिकायला पाठवायचे का नाही? शाळा म्हणजे एक ज्ञानाचे मंदिर असते. आई-वडिलांनतर एक शिक्षकच मुलांच्या भविष्याला कलाटणी देण्याचे त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम करतो.
Cibil Score | सिबिल स्कोर ऑनलाईन असा चेक करायचा फ्री मध्ये
परंतु शिक्षिकाच भांडायला लागल्या तर मुलांच्या भविष्याचे काय? सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन शिक्षिकांची जोरदार भांडणे सुरु आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या प्राध्यपक आणि महिला ग्रंथपालमध्ये फ्री स्टाईल हाणामारी सुरु आहे. विद्यार्थ्यांसोमरचा हा सर्व प्रकार सुरु आहे. दोन्ही शिक्षिका एकमेकींच्या झिंझ्या उपटाताना दिसत आहेत. दोन्ही शिक्षकांमध्ये सुरुवातील शाब्दिक वाद सुरु असतो.