Video viral | लेकराच्या आयुष्याशी खेळू नका!’, चिमुकला सिगारेट ओढतोय अन् पालक… Video शुट करणाऱ्यांवर भडकले नेटकरी, म्हणाले “लाज वाटली पाहिजे!”

सोशल मीडियावर प्रसिद्धी लोक काय करतील काही सांगता येत नाही. व्हिडीओवर काही लाईक्स अन् शेअर मिळवण्यासाठी लोक सर्व मर्यादा ओलांडत आहे. सोशल मीडियावर रोज कित्येक व्हिडिओ समोर येतात जे पाहून धक्का बसतो अशाच एका व्हिडीओची सध्या चर्चा होत आहे. व्हिडीओमध्ये एक चिमुकला चक्क सिगारेट ओढत आहे अन् कोणीतरी त्याचा व्हिडिओ शुट करत आहे.व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. लहान मुलांच्या पालकांना नेटकऱ्यांनी दोष दिला आहे.

Breaking news new update | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ई पीक पाहणी 2025 साठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पालकत्व ही मोठी जबाबदारी आहे. आपल्या मुलांवर योग्य संस्कार व्हावे ही पालकांची जबाबदारी असते. चुकीच्या संगतीत मुलं चुकीच्या गोष्टी शिकतात त्यामुळे पालकांना नेहमी मुलांवर लक्ष ठेवले पाहिजे. पण व्हायरल व्हिडीओमध्ये एक लहान मुल चक्क सिगारेट ओढताना दिसत आहे. तो जिन्यावर बसलेला आहे अन् सिगारेट ओढून तो धूर बाहेर सोडताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून लक्षात येते की, चिमुकल्याला कोणीतरी सिगारेट ओढायला शिकवले आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे चिमुकल्याला ओरडण्याऐवजी कोणीतरी त्याचा सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ शुट करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हे पाहून नेटकऱ्यांनी व्हिडिओ शुट करणाऱ्या व्यक्तीवर देखील टिका केली आहे.

New update | लाडक्या बहिणीच्या खात्यात एकाच वेळी ₹3000 जमा! तुमचं नाव आहे का यादीत?

अनेकदा लहान मुलं चुकीच्या सवयींच्या आहारी जातात अशा वेळी त्यांना प्रेमाने समजावे लागते. पण कोणीतरी मुलाला सिगारेट ओढू नये सांगण्याआधी त्याचा व्हिडिओ शुट करत आहे हे पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर होत आहे. अनेकांनी चिमुकल्याच्या पालकांना दोष दिला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत पालकांवर आणि व्हिडिओ शुट करणार्‍यांवर टिका केली आहे. अनेकांनी असाही दावा केला की, प्रसिद्धीसाठी चिमुकल्याच्या पालकांनीच व्हिडिओ शुट केला असावा. पण सत्य अद्याप समोर आलेले नाही. चिमुकल्याचा चेहरा ब्लर केल्याचे व्हिडीओमध्ये दिसते आहे.

 व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी  इथे क्लिक करा 

Leave a Comment