सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या शेतीच्या कामांची लगबग सुरू आहे. शेतीच काम करत असताना शेतकऱ्यांना नेहमीच सतर्क राहण्यास सांगितले जाते. कारण शेतात चिखलात काहीही लपून बसले असण्याची शक्यता असते. असंच एक उदाहरण सध्या समोर आलं आहे. एका शेतात अतिविषारी घोणस जातीचा साप आढळला आहे. हा खतरना साप तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल, कारण याचा रंग निळा आहे. याचा खतरनाक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल.
Ladki Bhaeen Yojana has | लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात, तुमचे पैसे जमा
शेतकरी होणं सोपी गोष्ट नाही. ऊन, वारा, पाऊस झेलत शेतकरी दिवस-रात्र शेतामध्ये कष्ट करीत राहतो. शेती करताना शेतकऱ्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कधी पक्ष्यांपासून पिकाचं रक्षण करावं लागतं, तर कधी शेतात लपलेल्या सापापासून स्वत:चा जीव वाचवावा लागतो. सध्या शिवार हिरवंगार झालं असलं तरी विंचू, काट्यांसह शेतात लपलेल्या सापांपासून स्वत:चा जीव वाचवणं मोठं जीकिरीचं काम. अशातच कधी उतरत्या छपरांच्या खाली तर कधी अडगळीच्या कुठल्यातरी शेतात लपून बसलेल्या सापांचा वाढता धोकाही मोठा आहे. अशावेळी शेतात किती जपून पाय टाकावा लागत असेल! याची कल्पना येईल.
Ladki Bahin June Hafta Date| लाडकी बहिण जून हफ्ता खात्यावर जमा होण्यास सुरुवात 3000 कोटी रुपये आले
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शेतात वावरताना शेतकऱ्याला निळ्या रंगाचं काहीतरी दिसलं. यावेळी त्यानं नीट पाहिलं तर हा साप होता. साधासुधा साप नाही तर घोणस जातीचा साप. अशाप्रकारे त्याला निळा रंग पहिल्यांदाच पाहून सर्वच अवाक् झाले. शेतकरीला सापाला पकडण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला काठी मारत आहे, मात्र हा अतिविषारी साप जोरात फना काढत शेतकऱ्यावर उलटा हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय.
पाहा व्हिडीओ