Video Viral news | अरे बाप आता हा काय प्रकार प्रसिद्धीसाठी जीवाशी खेळ! चिमुकल्याचा हात सापच्या विळख्यात अन् कुटुंब शूटिंग करण्यात व्यस्त, व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तसेच अलीकडे प्रसिद्धसाठी धोकादायक व्हिडिओ बनवण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सोशल मीडियाल लाईक्स आणि व्ह्यूजसाठी मिळवण्यासाठी लोक अगदी लहान बाळांचा देखील जीव धोक्यात घालत आहेत. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

new update | महागाई भत्ता 53 टक्के वरुन 55 टक्के ( 2 टक्के वाढ ) करणेबाबत राज्य सरकारकडून GR निर्गमित दि.18.05.2025

यामध्ये एका बाळाच्या हाताला सापाने विळखा घातलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कुटुंबातील सदस्य या दृश्याचा व्हिडिओ काढण्यात व्यस्त आहेत. त्यांनी बाळाचा जीव जाण्याची कोणतीही भीती नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एका चिमुकल्याच्या हाताला सापाने विळखा घातलेला आहे. चिमुकला आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सापाचा विळखा हळूहळू घट्ट होत चालला आहे. मात्र कुटुंबातील सदस्या याचा व्हिडिओ बनवत आहेत. आजूबाजूला आणखी काही चिमुकले खेळताना दिसत आहेत. साप चिमुकल्याच्या पायालाही वेढा घालण्याचा प्रयत्न करत असतो. पण चिमुकला उभा राहतो. कुटुंबातील सदस्य चिमुकला घाबरेला पाहूनही त्याला मदत करत नाहीत.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथ क्लिक करा

Leave a Comment