Viral Video | ‘तिला चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केल्याची शिक्षा…’, कॉलेजमधल्या प्रेयसीला प्रियकराकडून काठीने मारहाण; VIDEO पाहून नेटकरी संतप्त

Viral Video: नात्यांमध्ये प्रेमासह रागावर नियंत्रणही ठेवता आलं पाहिजे. अनेक जण रागात समोरच्या व्यक्तीवर हात उचलतात, ज्यामुळे नातं अधिक कमकुवत होतं. सोशल मीडियावर कधी पालकांनी मुलांना मारहाण केल्याचे किंवा पती-पत्नीमध्ये झालेल्या मारहाणीचे व्हिडीओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण, आता समोर आलेल्या व्हिडीओतील एक तरुण त्याच्या प्रेयसीला माराहाण करताना दिसत आहे.

Snake Viral Video | “देव विसरतो…पण कर्म दार ठोठावतं…” सापाबरोबर काय घडलं पाहा; वेदनेने तडफडणाऱ्या सापाचा VIDEO पाहून बसेल धक्का

आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो, त्या व्यक्तीने आपल्याबरोबर नेहमी आपल्या सुख-दुःखात राहावं, आपली सगळी स्वप्नं पूर्ण करावीत, आपली काळजी घ्यावी, असं प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. या सर्व इच्छा पूर्ण करणारा जोडीदार अनेक मुलींच्या नशिबात असतो. पण, कधी कधी नात्यात काही कारणामुळे दुरावा निर्माण होतो, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं सुरू होतात आणि हळूहळू हेच भांडण हाणामारीपर्यंत पोहोचते. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

HDFC Personal Loan | ५ लाख रुपयांच्या वैयक्तिक कर्जावर किती व्याज आकारले जाते? संपूर्ण EMI तपशील येथे तपासा.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कॉलेजमधील प्रेयसी तिच्या प्रियकराला भेटायला येते. यावेळी दोघांमध्ये वाद होतो ,ज्यावरून प्रियकर हातात काठी घेऊन प्रेयसीला मारहाण करतो. त्यानंतर तो तिला तिथून जायला सांगतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.

 

पाहा व्हिडीओ:

 

Leave a Comment