Viral video : राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेक प्राणी मानवी वस्तीत शिरताना दिसतायत, यात विशेषत: साप हा प्राणी बिळातून बाहेर येत शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी जी उबदार जागा मिळेल तिथे आसरा शोधतात. यात जंगलतोड करून नागरी वस्तीतही सापांचा वावर वाढत असल्याचे दिसतेय. अशाच सापाचा एक धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक सर्पमित्र एका घराबाहेरून नागिण आणि तिची अंडी रेस्क्यू करताना दिसतोय. हा व्हिडीओ एका दिवसात सोशल मीडियावर ३ कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
व्हिडीओमध्ये पाहू शकता, एक सर्पमित्र धाडस करून नागिण आणि तिच्या अंड्यांना त्या घराबाहेरील एका बिळातून बाहेर काढतोय. यासाठी आधी त्याने घराबाहेरील बिळाभोवतीची माती बाजूला केली. यावेळी त्यात नागिण असल्याचा संशय त्याला आला. पण, जेव्हा कुदळीने माती बाजूला केली तेव्हा त्याला बिळात एक नागिण फणा पसरवून बसलेली दिसून आली. या नागिणीला त्याने रॉडच्या मदतीने रेस्क्यू केले. यानंतर बिळ थोडे अधिक खोदताच त्याला नागिणीची बरीच अंडी दिसून आली, जी त्याने एका बरणीत भरली. नागिणीचे हे थरारक रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी तिथे बघ्यांचीदेखील मोठी गर्दी जमा झाली होती.
नागिणीच्या या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओ @murliwalehausla24 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, इतकी अंडी दिल्यानंतर नागिण कुठे लपली होती, तिचे रेस्क्यू कसे करण्यात आले.
aditi sunil tatkare | बँक खात्यात आले ₹ 3000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव