video: स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं चित्र पाहायला मिळतं. अदगी घरातली महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान अशीच एक विनयभंगाची खळबळजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते.त्यात कधी कधी असे व्हिडीओ समोर येतात जे पाहून पायाखालची जमीन सरकते. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मुलीसह रस्त्यावरुन जात असलेल्या एका महिलेसोबत अश्लील वर्तन करण्यात आले. स्कूटरवरुन जाणाऱ्या तरुणाने महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. काही समजण्यापूर्वी त्याने महिलेचे चुंबन घेतले. त्यानंतर छेड काढणारा तरुण स्कूटरवरुन पळून गेला. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल.
उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका बुरखाधारी महिलेची दिवसाढवळ्या छेडछाड करण्यात आली. हे लज्जास्पद कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना २०-०५-२०२५ रोजी दुपारी घडली. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एका अरुंद गल्लीतून चालत येणाऱ्या महिलेचे एका दुचाकीस्वाराने सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेतले, जो नंतर घटनास्थळावरून पळून गेला. ती महिला एका मुलासह रस्त्यावरून चालत होती. जेव्हा तो गुन्हेगार तिच्या समोर आला तेव्हा दुचाकीवरून त्या महिलेकडे झुकला आणि तिचे चुंबन घेतले. यानंतर प्रत्युत्तर म्हणून, महिलेने त्या पुरूषाला शिवीगाळ केली.
दरम्यान यानंतर उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये बुरखाधारी महिलेचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस ठाण्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोन पोलिस त्या विकृताला धरून आहेत आणि तो लंगडा चालताना दिसत आहे. सुहेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोपीला कान धरून पोलिसांची माफी मागताना ऐकू येते, “सर गलती हो गई, अब नही होगी.” याचा अर्थ असा होतो की, “मी चूक केली साहेब, ती पुन्हा होणार नाही.” व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विकृताला चालण्यास त्रास होत आहे.
व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा